Posts

Showing posts from February, 2018

ती आणि मी

तिचं आणि माझं पूर्वी फारसं पटत नसे . विळ्या भोपळ्याचंच नातं म्हणा ना ! पण काही उपाय नव्हता . आम्हाला एकत्र राहणं भाग होतं . आमची ओळख तशी फार जुनी . म्हणजे मी जवळपास जन्मल्यापासूनच ओळखते म्हणा ना तिला . कोणत्याही नवीन नात्यामध्ये रुळायला माणसाला वेळ लागतोच ! तसाच वेळ आम्हालाही लागला . सुरवातीची काही वर्ष फार अवघड होती . हळू हळू मतभेद विरले . हे व्हायला चांगली वीस वर्ष जावी लागली . पण आता सगळं ठीक आहे . खरं तर आता आमची चांगली मैत्री झालीय . तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल म्हणतेय ते ! माझ्या आईबद्दल . बराच ओरडा आणि मार खाल्लाय मी तिच्याकडून ! लहानपणी आई बद्दल लिहिलेल्या सगळ्या कविता खोटया वाटायच्या . पुस्तकामधली आई प्रेम , करुणा , त्याग , दया यांचं मूर्तिमंत रूप असायची . पण प्रत्यक्ष अनुभव काही निराळाच निघाला . सगळी पुस्तकं आपली दिशाभूल करत आहेत असे वाटे . तसं   तर आपल्या या प्राणप्रिय भारतभूमीवर   आई वडीलांकडून मुलांनी मार खाणं फारसं नवीन नाही . पण माझी तक्रार विनाकारण