Posts

Showing posts from 2018

हॅपी बर्थडे पुलं

Image
मुंबई मधल्या चाळीतील एक लहानसं घर . आजी , आई , बाबा , ताई आणि एक छोटा भाऊ असं छोट कुटुंब . यात काही फारसं विशेष नाही . पण हा काळ आहे साधारण १९९९ - २००० सालंचा . जवळपास सगळ्यांच्या घरी रंगीत टीव्ही आलेले होते . पण या घरात मात्र टीव्ही नव्हता . परवडत नव्हता म्हणून नाही . पण घरातल्या मुलांनी काय बघायचं याचा निर्णय घरातलं आई बाबांचं सेन्सॉर बोर्ड घ्यायचं ! या घरात होती खूप सारी पुस्तकं . त्या छोट्याशा घरात अडचण वाटावी इतकी पुस्तकं ! आणि खूप साऱ्या कॅसेट्स . रोज संध्याकाळी बाबा कॅसेट्स लावायचे आणि घरातले सगळे मिळून त्या ऐकायचे . आणि त्यातली सगळ्यांची आवडती कॅसेट होती पुलंच्या ' असा मी असामी ' ची . घरातल्या एक अक्षरही न वाचता येणाऱ्या आजीपासून ते सगळ्यात छोट्या नुकत्याच पहिलीत गेलेल्या   सहा वर्षाच्या बाबूपर्यन्त सगळ्यांना पाठ होती ती रेकॉर्ड . ते घर माझं होत . आज इतकी वर्ष झाली तरी मला ती रेकॉर्ड पाठ आहे . अजूनही मला ती तितकीच आवडते . पुलंची ही मोहिनी का...